दुर्गे दुर्घट भारी – श्री देवीची आरती | Aarti Durge Durghat Bhari | Marathi

दुर्गे दुर्घट भारी – श्री देवीची आरती
Durge Durghat Bhari

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ।
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ॥
वारी वारीं जन्ममरणाते वारी ।
हारी पडलो आता संकट नीवारी ॥ १ ॥

जय देवी जय देवी महिषासुरमथनी ।
सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥ धृ. ॥

त्रिभुवनी भुवनी पाहतां तुज ऐसे नाही ।
चारी श्रमले परंतु न बोलावे काहीं ॥
साही विवाद करितां पडिले प्रवाही ।
ते तूं भक्तालागी पावसि लवलाही ॥ २ ॥

जय देवी जय देवी महिषासुरमथनी ।
सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥

प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासां ।
क्लेशापासूनि सोडी तोडी भवपाशा ॥
अंबे तुजवांचून कोण पुरविल आशा ।
नरहरि तल्लिन झाला पदपंकजलेशा ॥ ३ ॥

जय देवी जय देवी महिषासुरमथनी ।
सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *